विराटला 25 धावांची जरुरी
वृत्तसंस्था / बडोदा
येथे रविवारी यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी केवळ 25 धावांची जरुरी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर आणि लंकेचा कुमार संगकारा यांचा समावेश आहे. कोहलीने रविवारच्या सामन्यात 25 धावा जमविल्या तर तो या यादीतील तिसरा फलंदाज ठरेल. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 556 सामन्यांत आणि 623 डावांत आतापर्यंत 27 हजार 975 धावा जमविल्या आहेत. लंकेच्या संगकाराने 28016 धावा केल्या आहेत. भारताच्या सचिन तेंडुलकरने 664 सामन्यांत आणि 782 डावांत 34357 धावा जमवित अग्रस्थान मिळविले असून ते अद्याप अबाधित राहिले आहे.