कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कराटे स्पर्धेत विराज, वेदांत यांचे यश

10:24 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा शाळेचे कराटेपटू विराज विनायक हलगेकर व वेदांत विनायक हलगेकर यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण व कास्यपदक फटकाविले. गोवा-म्हापसा येथे शोटोकॉन कराटे टू संघटना भारत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विराज विनायक हलगेकर यांनी कट्टा सुवर्ण कुमुटेत सुवर्ण तर वेदांत विनय हलगेकर याने कट्टा व कुमुटे या प्रकारात कास्यपदक पटकाविले. नुकत्याच बेनकनहळ्ळी येथील ओम कार्यालयात फ्लाईंग फिट स्पोर्ट्स अकादमी आयोजित बेळगाव जिल्हा खुल्या कराटे चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत विराजने दोन सुवर्ण तसेच उडपी कराटे बुडोकान  फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या केबीकेआय आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विराज हलगेकरने कट्टा व कुमिटे प्रकारात सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली. विराज व वेंदात यांना कराटे प्रशिक्षक आकाश बडगेर यांचे मार्गदर्शन तर संत मीरा शाळेच्या क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील यांचे व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article