For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा मराठा समाजच्या अध्यक्षपदी विराज परब

04:55 PM Nov 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
बांदा मराठा समाजच्या अध्यक्षपदी विराज परब
Advertisement

तर उपाध्यक्षपदी परिमल सावंत बिनविरोध

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

बांदा मराठा समाजच्या अध्यक्षपदी विराज परब तर उपाध्यक्षपदी परिमल सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
ही सभा येथील विकास सोसायटीच्या अळवणी सभागृहात संपन्न झाली. सचिवपदी आनंद वसकर, सहसचिवपदी हेमंत मोर्ये-सावंत, खजिनदारपदी महादेव सावंत-मोर्ये यांची तर सदस्यपदी स्वप्नील सावंत, लव रेडकर, अक्षय परब, रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोलकर, संतोष परब, श्यामसुंदर गवस, मिलिंद सावंत, विकी कदम, जयप्रकाश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली तर सल्लागार मंडळामध्ये माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, माजी सचिव महादेव सावंत, माजी सहसचिव राजेश सावंत, दीपक सावंत यांची प्रसार माध्यम प्रमुखपदी माजी खजिनदार राकेश परब याची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Advertisement

सभेची सुरुवात सचिव महादेव सावंत यांनी केली. यामध्ये सर्वप्रथम मराठा समाजाचे दिवंगत नेते (कै.) विनायक मेटे, संदेश भोगले, सुभाष मोर्ये यांना आदरांजली वाहण्यात आली. सचिव म. गो.सावंत यांनी मागील सभेचा इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष राजाराम सावंत यांनी मागील काही वर्षांमध्ये बांदा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम सांगितले. त्यानंतर नवीन पदाधिकारी व कार्यकारणी यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष विराज परब यांनी बांदा मराठा समाजाची पुढील उपक्रमाची माहिती सभेपुढे मांडली.यावेळी सागर सावंत, समीर सावंत, भूषण सावंत, हनुमान सावंत, पापू उर्फ निलेश कदम, आनंद देसाई, स्वप्निल सावंत, विष्णू वसकर, मनोज सावंत, सौ. अरुणा सावंत, श्री. मोर्ये सावंत आदी बांदा परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.