विराज मर्गजची मुंबई उपनगर कबड्डी संघात निवड
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचा सुपुत्र
कुडाळ -
पुणे येथे होणाऱ्या 52 व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर (पूर्व )कबड्डी संघात मूळ कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचा राहिवासी व सध्या भांडुप - मुंबई येथील विराज प्रल्हाद मर्गज याची निवड झाली आहे. सदर स्पर्धा 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.कबड्डी या खेळात स्वतःचा ठसा उमटवित विराज मर्गज याने मिळविलेले यश खरोखरच प्रेरणादायी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पांग्रड या गावातील विराज याने मेहनत, जिद्द व जिंकण्याची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर आज राज्य पातळीवरील कबड्डीत आपली दमदार कामगिरी नोंदविली आहे. शिस्तबद्ध सराव, कष्ट आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ (भांडुप- मुबई) येथे मिळालेले उत्कृष्ट प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि अखंड पाठिंब्यामुळे आपल्या खेळात सातत्य राखले गेल्याचे विराज सांगतो. विराजच्या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.