For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विपुल बन्सल जिल्हा प्रभारी सचिव

06:39 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विपुल बन्सल जिल्हा प्रभारी सचिव
Advertisement

राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांसाठी प्रभारी सचिवांची नेमणूक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य सरकारने शनिवारी सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा प्रभारी सचिवांची नेमणूक केली आहे. याद्वारे राज्याच्या विकास नियोजन कार्यक्रमांची अंमलबजावणी, अहवालांची पडताळणी, अनपेक्षित तपासणी करून अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव म्हणून विपुल बन्सल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement

या संदर्भात, कामगार आणि प्रशासकीय सुधारणा खात्याच्या अप्पर सचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. राज्याच्या विकास योजना, कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि पडताळणी, अहवालांची तपासणी, अनपेक्षित तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी सरकारच्या अप्पर मुख्य सचिव/मुख्य सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची 11 डिसेंबर 2023 रोजी विविध जिल्ह्यांसाठी जिल्हा प्रभारी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याशिवाय, या अधिसूचनेसोबत जोडलेल्या यादीत नमूद केल्यानुसार काही जिल्ह्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांची बदल करून  पुढील आदेशापर्यंत जिल्हा प्रभारी सचिव म्हणून नेमणूक करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे.

सर्व जिल्हा प्रभारी सचिव, जिल्हा पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील तालुका कार्यालय, तालुका/जिल्हा इस्पितळ आणि जिल्ह्यातील इतर मुख्य कार्यालये/स्थळांना भेटी देतील तेव्हा तेथे उपस्थित राहणे, त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलावीत. तसेच, सर्व जिल्हा प्रभारी सचिवांनी जिल्ह्यातील कर्नाटक विकास कार्यक्रम (केडीपी) बैठकांमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपापल्या जिल्ह्यांना भेट देण्यापूर्वी जिल्हा पालकमंत्र्यांना माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रभारी अधिकारी                                 जिल्हा

विपुल बन्सल                                     बेळगाव

एम. दीपा चोळण                                धारवाड

उज्ज्वलकुमार घोष                            विजापूर

रितेशकुमार सिंग                                कारवार

मोहम्मद मोहसीन                              बागलकोट

रमणदीप चौधरी                                    गदग

डॉ. के. व्ही. त्रिलोकचंद्र                        बळ्ळारी

डी. रणदीप                                        बिदर

डॉ. आर. विशाल                                  हावेरी

व्ही. अन्बुकुमार                                मंड्या

एल. के. अतिक                                  मंगळूर

अम्लान आदित्य बिश्वास                      चित्रदुर्ग

डॉ. एकरुप कौर                              कोलार

पंकजकुमार पांडे                               कलबुर्गी

डॉ. एस. सेल्वकुमार                           म्हैसूर

Advertisement
Tags :

.