Kolhapur : कामगार संहितांविरोधात कागलमध्ये सीटूचे तीव्र आंदोलन
कंत्राटीकरण वाढवणाऱ्या संहितांविरोधात कागलमध्ये संतप्त आंदोलन
कागल : केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे २९ कायदे रद्द करून कामगार विरोधी व मालक दर्जने चार सहिता आणलेले आहेत. या चार संहितांना विरोध करण्यासाठी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून सिदूच्या वतीने कागल तहसील कार्यालयावर निदर्शन करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात आशा, गटप्रवर्तक, बांधकाम कामगार, व ऊस तोडणी कामगार उपस्थित होते. या देशव्यापी आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना सिटुचे जनरल सेक्रेटरी कॉ शिवाजी मगदूम म्हणाले केंद्र सरकारने लागु केलेल्या चार कामगार संहितामुळे कामगार देशोधडीला लागेल अशी भिती व्यक्त करत या संहिता कामगारांना न्याय देणाऱ्या नसुन मालकांना संरक्षण देणाऱ्या असल्याची टीका केली.
नवीन चार कामगार संहिता लागू केल्यास कामाचे तास ८ तासावरून १२ तास करण्यासंबंधीची तरतूद आहे. यामुळे कामगारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडेल आणि त्यांना कौटुंबिक व सामाजिक जीवनासाठी वेळ मिळणार नाही.
८ तासांचा कामाचा दिवस हा अनेक दशकांच्या संघर्षातून मिळालेला हक्क आहे, आणि तो हिरावून घेतला जाणार आहे असा आरोपही सिटुचे जिल्हा कॉ शिवाजी मगदूम यांनी केला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नवीन संहितेमुळे कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन मिळेल, कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होतील. तसेच कामगारांना केवळ राबवूनघेतले जाईल आणि त्यांचे हक्क व सुविधा रद्द होतील.
यावेळी सिटु जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, कॉ. विक्रम खतकर, कॉ. मनिषा पाटील, कॉ. आनंदा डाफळे, कॉ. संगिता कामते, कॉ. आरती लुगडे, राजाराम आरडे, कॉ. दिनकर जाधव, कॉ. यल्लाप्पा पाटील, कॉ. राजश्री खिरूगडे, कॉ. साताप्पा पाटील, कॉ. के. वाय. जाधव, कॉ. अर्जम मकुबाळे, कॉ. विनोद वहु, कॉ. राणी मगदूम, कॉ. पद्मा भारमल, कॉ. सुवर्णा लोहार, कॉ. गिता करडे, कॉ. माया काशिद आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित हेते.