For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करवाढ विरोधात केनियामध्ये हिंसक आंदोलन

06:27 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
करवाढ विरोधात केनियामध्ये हिंसक आंदोलन
Advertisement

संसदेत शिरले हजारो लोक : मोठ्या प्रमाणात जाळपोळ : पोलिसांच्या कारवाईत मोठी जीवितहानी

Advertisement

वृत्तसंस्था/ नैरोबी

आफ्रिकेतील केनिया या देशात करवाढीच्या विरोधात लोकांनी बंड केले आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरत आंदोलन केले तसेच संसदेत शिरून तेथे जाळपोळ केली आहे. राजधानी नैरोबीतील या हिंसेला रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला असून यात कमीतकमी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत.आंदोलकांनी केनियाच्या संसदेच्या काही हिस्स्यांना पेटवून दिले आहे. तर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी दगडफेक केली. यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. तर जमाव संसदेत शिरल्याचे कळताच खासदारांनी त्वरित तेथून काढता पाय घेतला.

Advertisement

केनियाच्या सरकारने एका वादग्रस्त वित्त विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे देशातील करप्रमाण वाढणार आहे. देशावर असलेला कर्जाचा भार कमी करण्यासाठी कर माध्यमातून 2.7 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त निधी जमविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केनिया सरकार सध्या कर्जावरील व्याजापोटी सरकारी खजिन्याचा 37 टक्के खर्च करत आहे.राजधानी नैरोबी आणि अन्य शहरांच्या रस्त्यांवर लोकांनी आंदोलन चालविले आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. तसेच हवेत गोळीबारही केला. याच्या प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आहे. अध्यक्ष विलियम रुटो यांनी स्वत:चे पद सोडावे अशी आंदोलकांची मागणी आहे. रुटो यांनीच देशाची आर्थिक स्थिती विचारात घेत हे विधेयक सादर करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement
Tags :

.