For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karachi protests | कराचीमध्ये खामेनेई मृत्यूनंतर हिंसक निदर्शन; १२ जणांचा मृत्यू

01:56 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
karachi protests   कराचीमध्ये खामेनेई मृत्यूनंतर हिंसक निदर्शन  १२ जणांचा मृत्यू
Advertisement

                       खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात तणाव वाढला

Advertisement

कराची -खामेनेई यांच्या मृत्यूनंतरच्या निदर्शनांची आग पाकिस्तानात पसरली आहे. पाकिस्तानातील कराची येथे हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिकन दूतावासाच्या परिसराबाहेर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात गुंतलेल्या जमावाने गर्दी केली. परिस्थिती चिघळत असताना अमेरिकन बाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केल्यामुळे१२ जणांचा मृत्यू झाला. अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्युनंतरचा संताप पाकिस्तानात पसरला आहे.

पाकिस्तानातील कराचीमध्येहिंसक निदर्शने सुरू आहेत. अमेरिकन दुताबासासोबतच युएनच्या कार्यालयावरही संतप्त जमावाने हल्ला केला. जमावाने अमेरिकन दूतावासाच्या आवारात आग लावली आणि तोडफोड केली.

Advertisement

पाकिस्तानी पोलिसांनी जमावाला आवरण्याचा प्रयत्न केल्यानंतरही काही लोक दुतावासात घुसल्यानंतर तेथे तैनात अमेरिकन सैनिकांनी गोळीबार केल्याने १२ लोकांना प्राणास मुकावे लागले. कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर रविवारी सकाळीच मोठ्या संख्येने निदर्शक जमल्यानंतर गोळीबार आणि संघर्षाची घटना घडली. इराणमध्ये अयातुल्ला खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केल्याबद्दल निदर्शक आपला राग व्यक्त करताना दिसून येत होते.

Advertisement
Tags :

.