For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीतील डफळापूरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगडफेकीत सहाजण जखमी, गावात संचारबंदी लागू

05:57 PM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांगलीतील डफळापूरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी  दगडफेकीत सहाजण जखमी  गावात संचारबंदी लागू
Advertisement

रघुनाथ भोसले

Advertisement

रांजणी (जत): जत तालुक्यातील डफळापूर येथे महापुरुषाच्या डिजिटल फलकावरून (पोस्टर) दोन गटांमध्ये पेटलेला वाद विकोपाला गेला व त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. या हिंसक संघर्षात दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून तब्बल ६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.​

बाजारपेठ ठप्प, गावाला छावणीचे स्वरूप

Advertisement

या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गावात तातडीने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली असून रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. संपूर्ण डफळापूर गावाला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः डफळापूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शांततेचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कवठेमहांकाळ व जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह गावात ठाण मांडून बसले आहेत. दंगल नियंत्रण पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.