For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनच्या लीड्समध्ये हिंसा

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनच्या लीड्समध्ये हिंसा
Advertisement

दंगलखोरांनी पेटविली वाहने : पोलिसांवर दगडफेक

Advertisement

वृत्तसंस्था /लीड्स

ब्रिटनच्या लीड्स शहरात गुरुवारी रात्री हिंसा झाली आहे. जमावाने पोलिसांची वाहने आणि बसेस पेटवून दिल्या आहेत. आई-वडिलांकडून मुलांना काढून घेत त्यांना एका यंत्रणेकडून चाइल्ड केअर होममध्ये पाठविले जात होते, याच्या विरोधात लोक रस्त्यांवर उतरले होते. यानंतरच तेथे हिंसा झाली आहे. लीड्सच्या हेयरहिल्स भागातील लक्झरी स्ट्रीटवर गुरुवारी एजेन्सीच्या कार्यवाहीच्या विरोधात लोक गर्दी करू लागले होते. काही वेळातच हा जमाव उग्र झाला, या गर्दीत अल्पवयीन देखील सामील होते. तणावपूर्ण स्थिती पाहता पूर्ण भागात हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवली जात होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

या हिंसेच्या घटनेमुळे धक्का बसला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. अशाप्रकारच्या हिंसेला ब्रिटनमध्ये कुठलेच स्थान नाही. सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे ब्रिटनच्या गृहमंत्री यवेटे कूपर यांनी म्हटले आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर गिप्टन आणि हेयरहिल्सच्या कौन्सिलर सलमा आरिफ यांनी लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन पेले आहे. हिंसेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यात आसपासचे लोक देखील सामील झाले. पोलिसांनुसार स्थिती आता नियंत्रणात आहे, परंतु गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याची ताकीद पोलिसांकडून लोकांना देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून हेयरहिल्स येथील मुलांना चाइल्ड केयर होममध्ये हलविले जात आहे. याचमुळे हेयरहिल्स येथील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हेयरहिल्स आणि आसपासच्या भागात मुस्लीम धर्मीयांचे वास्तव्य अधिक आहे, यातील अनेक जण स्थलांतरित असून ते ब्रिटनचे नागरिक नाहीत. कुटुंबीयांच्या देखरेखीत कुठल्याही मुलाचे पालनपोषण योग्यपद्धतीने होत नसल्याचे वाटल्यास प्रशासनाकडुन मुलांना चाइल्ड केयर होममध्ये हलविले जात आहे.

Advertisement
Tags :

.