For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये हिंसा, जाळपोळ

06:10 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये हिंसा  जाळपोळ
Advertisement

उजव्या विचारसरणीचा पक्ष पराभूत : रस्त्यांवर उतरले समर्थक

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीची सरशी होण्याचे संकेत देणाऱ्या एक्झिट पोलनंतर राजधानी पॅरिस समवेत पूर्ण देशात हिंसा भडकली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना झटका बसला आहे. तर एक्झिट पोलमध्ये डाव्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मिळविणारा मरीन ले पेन यांची नॅशनल रॅली पार्टी रविवारी झालेल्या मतदानानंतर तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे म्हटले गेले होते. तर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाव राहणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले. यानंतर नॅशनल रॅली पार्टीच्या समर्थकांनी रस्त्यांवर उतरत जाळपोळ सुरु केली आहे.

फ्रान्समध्ये निदर्शक रस्त्यांवर जाळपोळ अन तोफडोड करताना दिसून आले आहेत. हिंसा पाहता देशभरात दंगलविरोधी पोलिसांना पाठविण्यात आले आहे. फ्रेंच निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये डाव्या आघाडीच्या विजयाची शक्यता पाहता पॅरिसमध्ये जल्लोष तसेच हिंसा दोन्ही प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. डावीकडे झुकलेल्या आघाडीला सत्ता मिळणार असल्याचे कळताच हजारो लोकांनी जल्लोषासाठी पॅरिसच्या प्लेस डे ला रिपब्लिक येथे धाव घेतली. तर दुसरीकडे सत्ताप्राप्तीची अपेक्षा करत असलेल्या मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली पार्टीच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

अश्रूधुराचा वापर

फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हिंसा झाली आहे. ठिकठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ केली आहे. तर दंगलविरोधी पोलीस जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. झटापटींदरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला आहे.

तिसऱ्या स्थानावर नॅशनल रॅली

पहिल्या टप्प्यातील मतदानात एक तृतीयांश मतांसह विजय प्राप्त करणारी नॅशनल रॅली पार्टी संसदीय निवडणुकीत विजयाची अपेक्षा करत होती. परंतु 7 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीनंतर एक्झिट पोल्सनी न्यू पॉप्युलर फ्रंटच्या बॅनर अंतर्गत एकत्र आलेल्या डाव्या पक्षांना 172 जागा मिळणार असल्याचे संकेत दिले आहे. तर मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालील एनसेंबलला 150 जागा मिळतील असा अनुमान आहे. नॅशनल रॅली जवळपास 132 जागांवर तिसऱ्या क्रमांका राहू शकते.

पंतप्रधानांचा राजीनामा

डाव्या आघाडीच्या विजयाच्या शक्यतेनंतर फ्रान्सचे पंतप्रधान गेब्रियल अटाल यांनी सोमवारी अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडे स्वत:चा राजीनामा सोपविला आहे. एनसेंबलने अनुमानित जागांच्या तुलनेत तीनपट अधिक जागा जिंकल्या आहेत. परंतु आमच्याकडे बहुमत नाही. याचमुळे मी अध्यक्षांकडे राजीनामा सोपविणार असल्याचे अटाल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.