For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनोद मेत्री जर्मनीतील स्पर्धेसाठी पात्र

11:47 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
विनोद मेत्री जर्मनीतील स्पर्धेसाठी पात्र
Advertisement

बेळगाव : जर्मनी येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचा शरीरसौष्ठपटू विनोद मेत्री यांची भारतीय संघात निवड झाली आहे. जर्मनी येथे 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारतीय चमुतमधून तो रवाना होणार आहे. मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये विनोद मेत्री याने आपल्या गटात पिळदार शरीरराच्या जोरावर सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीची दखल घेवून मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. या स्पर्धेत पात्र ठरणारा विनोद मेत्री हा बेळगावचा पहिला शरीरसौष्ठपटू आहे. विनोदला आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार यांचे मार्गदर्शन तर बेळगाव डिस्ट्रीक बॉडीबिल्डर्स असोसिएशन व स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, मिहीर पोतदार, महेश सातपुते तसेच त्यांच्या आई-वडील, पत्नी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.