विनोद कांबळी यांच्या मेंदुची स्थिती अजुनही अस्थिर
मुंबई
भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीमध्ये अजूनही फारशी सुधारणा झालेली नाही. त्यांच्या मेंदूची स्थिती अजूनही अस्थिर आहे. विनोद कांबळी यांना मदतीशिवाय चालताही येत नाही आहे.
क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना मागच्या शनिवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना स्नायू दुखीचा त्रास आणि ताप असल्याने चक्कर आली म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. एक आठवडा झाला तरी त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसत नाही आहे.
विनोद कांबळी यांनी नुकताच आपल्या दोन मुल आणि पत्नी सोबत हॉस्पिटलमध्ये ख्रिसमस साजरा केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडीओ नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची चर्चा रंगली होती. पण विनोद कांबळी हे अजून मदतीशिवाय चालू शकत नाहीत.
क्रिकेटपटूची ही अवस्था पाहून त्याला अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च दानशुरांनी उचलला आहे. तर त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी वानरसेना या संस्थेच्या माध्यमातून २५ लाखांची मदत जाही केली आहे.
विनोद कांबळी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अनेक जण येत आहेत. त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा कांबळी यांनी दिल्या. यावेळी कांबळी म्हणाले," माझी तब्येत ठीक आहे. तसेच अनेकजण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. अनेकांनी मला मदतही केली आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्व देशवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा."