For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनफास्टची नवी कार भारतात लाँच

06:04 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनफास्टची नवी कार भारतात लाँच
Advertisement

25 लाख किंमत : 7 जण बसू शकतील अशी आरामदायी गाडी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रामध्ये विनफास्ट कंपनीने आपली नवी गाडी नुकतीच उतरविली आहे. विनफास्ट व्हिएफ एमपीव्ही 7 ही नवी गाडी नुकतीच लाँच केली आहे. मोठ्या कुटुंबासाठी सोयीस्कर असणारी ही गाडी ग्राहकांना अंदाजे 25 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनीची ही लाँच झालेली तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.

Advertisement

बुक कुठे कराल

ग्राहकांना ही गाडी संकेतस्थळावरुन किंवा त्यांच्या 50 अधिकृत विक्री केंद्रांमधून बुक करता येणार आहे. गाडी बुक करायची असल्यास ग्राहकांना आगाऊ 21 हजार रुपये भरावे लागणार आहेत. विनफास्टची नवी गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 517 कि.मी. चे अंतर कापू शकणार आहे. सदरची गाडी शुन्य ते 100 कि.मी. वेग केवळ 10 सेकंदात घेऊ शकणार आहे. 10 ते 70 टक्के बॅटरी 30 मिनिटांमध्ये चार्ज होऊ शकेल. या गाडीमध्ये सात जण आरामात बसू शकतील, अशी सोय आहे. मोठ्या कुटुंबासाठी ही गाडी सोयीची असणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्या

समोरच्या बाजुला फुल विड्थचे एलईडी लाईट बार देण्यात आले आहेत तसेच एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाईट्स, टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टीम, मल्टिफंक्शनल स्टिअरींग व्हिल असेल.

Advertisement
Tags :

.