For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेश निवड चाचणीत भाग घेणार

06:13 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनेश निवड चाचणीत भाग घेणार
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला मल्ल विनेश फोगटला आगामी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने दिली आहे.

सदर निवड चाचणी स्पर्धा 30 आणि 31 मे रोजी घेतली जाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल विनेशने आभार मानले आहेत. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजन गटातील अंतिम फेरीमध्ये विनेश फोगटला अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर तिला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यावर निर्बध घालण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.