For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी माडखोल येथील भाजपाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनेश तावडे यांनी गेल्या काही वर्षात भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या संघटन कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यानी ही निवड केली आहे.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस जावेद खतीब, श्री पुजारे, जयेश चिंचाळकर, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारी, जावेद खान, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश विठ्ठलकर, राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक तथा जिल्हा चिटणीस निलेश हरी चव्हाण, बाबुल शेटकर, कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रकाश सावंत, प्रसाद पाटकर, निमंत्रित तानाजी काशिनाथ गायतोंडे, कुडाळचे माजी युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, ओंकार कोरगावकर, मयूर राणे, विनय सावंत, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, पारस कांबळे, सागर चव्हाण, शुभम परब, समीर सावंत, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल गावडे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी, बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कोचरेकर आदीसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या निवडीबद्दल विनेश सावंत विनेश तावडे यांचे भाजपा कार्यालयात भाजपचे युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, संदीप गावडे, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, गेळे सरपंच सागर ठोकरे, संकेत राऊळ, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, हितेन नाईक, अभिजीत धुरी आदींनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.