For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेश फोगटची पदकेही ‘कर्तव्य पथा’वर

06:48 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
विनेश फोगटची पदकेही ‘कर्तव्य पथा’वर
Advertisement

पीएमओ’कडे जाताना पोलिसांकडून अडवणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई क्रीडास्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगट हिने महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ आपले पुरस्कार परत केले आहेत. शनिवार, 30 डिसेंबरला विनेश फोगट पुरस्कार परत करण्यासाठी पीएमओमध्ये जात असताना पोलिसांनी तिला अडवले. यानंतर ‘कर्तव्य पथा’वर तिने पुरस्कार ठेऊन परतीचा मार्ग स्विकारला. तिने तीन दिवसांपूर्वी पुरस्कार मागे घेण्याची घोषणा केली होती.

Advertisement

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिग्गज कुस्तीपटूंचा असलेला विरोध कायम आहे. बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घेषणा यापूर्वीच केली आहे. तर साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचदरम्यान विनेश फोगटने स्वत:ला प्राप्त पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. स्वत:ला मिळालेले मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार मी परत करणार असल्याचे विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्षपदाची  21 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी विजय मिळविला होता. याच्या विरोधात बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. तर साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला होता.

देशासाठी लाजिरवाणा दिवस : काँग्रेस

एखाद्या घटनेचा निषेध करण्यासाठी खेळाडूंकडून पुरस्कार परत करण्याचा घटना  देशासाठी लाजिरवाणी असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे. ‘देशासाठी लाजिरवाणा दिवस. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर देशासाठी पदक जिंकणारी विनेश फोगट हिने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठेवला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.’ असे युवक काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे.

Advertisement
Tags :

.