For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेश फोगट पराभूत

06:39 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
विनेश फोगट पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

येथे सुरू असलेल्या 2026 च्या आशियाई स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत भारताची दुहेरी विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेती मल्ल विनेश फोगटला उपांत्य फेरीत मिनाक्षीकडून पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या 53 किलो वजन गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत मिनाक्षी गोयतने विनेशचा 6-4 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. या चाचणी स्पर्धेत पहिल्या फेरीत विनेशने ज्योतीचा 7-1 अशा गुणांनी पराभव केला होता. तर मिनाक्षीने अंतिम पांगलचा पराभव करून उपांत्यफेरी गाठली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.