महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘विंध्यगिरी’ राष्ट्राला समर्पित

07:00 AM Aug 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नौदलाची ताकद वाढणार : राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये जलावतरण

Advertisement

‘विंध्यगिरी’बद्दल...

Advertisement

युद्धनौकेची वैशिष्ट्यो...

वृत्तसंस्था /कोलकाता

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुऊवारी आधुनिक युद्धनौका आयएनएस विंध्यगिरी देशाला समर्पित करण्यात आली. या अत्याधुनिक युद्धनौकेच्या समावेशामुळे नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. नौदलात सामील होण्यापूर्वी युद्धनौकेच्या अनेक चाचण्या केल्या जातील. या युद्धनौकेचे 75 टक्के भाग स्वदेशी आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांनी म्हणजेच एमएसएमई कंपन्यांनी बनवले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीच्या काठावर असलेल्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड’च्या आवारात राष्ट्रपती मुर्मू यांनी युद्धनौकेचे उद्घाटन केले. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प 17-अल्फा’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सात जहाजांपैकी हे सहावे जहाज आहे. ‘प्रकल्प 17-अल्फा’ कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक लिमिटेडद्वारे एकूण चार आणि ‘जीआरएसई’द्वारे तीन युद्धनौकांची बांधणी करण्यात आली. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या पाच युद्धनौका 2019 ते 2022 दरम्यान लाँच करण्यात आल्या. ‘आयएनएस विंध्यगिरी’ ही नौदलाच्या ‘17-अल्फा’ प्रकल्पातील सहावी युद्धनौका आहे. जुलै 1981 ते जून 2012 पर्यंतच्या तिच्या सुमारे 31 वर्षांच्या सेवेदरम्यान, जुन्या विंध्यगिरीने (आयएनएस विंध्यागिरी) विविध आव्हानात्मक कारवाया आणि बहुराष्ट्रीय सरावात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला होता. कर्नाटकातील पर्वतराजीवरून युद्धनौकेला विंध्यगिरी हे नाव देण्यात आले आहे.

भारताच्या निर्धाराचे प्रतीक

17 ऑगस्ट रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, (‘जीआरएसई’) कोलकाता येथे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते युद्धनौकेचा अनावरण  सोहळा पार पडल्याचे नौदलाने जाहीर केले. ‘आयएनएस विंध्यगिरी’ हे स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या भवितव्याकडे स्वत:ला स्थान देताना समृद्ध नौदल वारशाचा स्वीकार करण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक असल्याचे नौदलाने नमूद केले आहे.

आव्हाने झेलण्यास सक्षम

‘प्रकल्प 17-अल्फा’ अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या युद्धनौकांची लांबी 149 मीटर आहे. तसेच त्यांचे वजन सुमारे 6,670 टन असून ते 28 नॉट्सच्या वेगाने धावू शकते. ही युद्धनौका हवा, जमीन आणि जल या तिन्ही ठिकाणांवरील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे. ‘प्रकल्प 17-अल्फा’ युद्धनौकांची रचना भारतीय हवाई दलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने केली आहे.

‘माय बंगाल, नशामुक्त बंगाल’ अभियान

विंध्यगिरी युद्धनौकेच्या उद्घाटनापूर्वी कोलकाता दौऱ्यावर असताना राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘मेरा बंगाल, नशामुक्त बंगाल’ मोहीम सुरू केली. नशामुक्त भारत अभियानांतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. राजभवनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालचा हा दुसरा दौरा आहे. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यापूर्वी मुर्मू मार्चमध्ये राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article