For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंचूरमध्ये सिलेंडर स्फोटात देवकते कुटुंबीयांचा संसार उद्ध्वस्त; महादेव कोगनुरे यांच्याकडून तातडीची मदत; संकटग्रस्त कुटुंबाला दिलासा

12:11 PM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंचूरमध्ये सिलेंडर स्फोटात देवकते कुटुंबीयांचा संसार उद्ध्वस्त  महादेव कोगनुरे यांच्याकडून तातडीची मदत  संकटग्रस्त कुटुंबाला दिलासा
Advertisement

विंचूर, ता. दक्षिण सोलापूर | प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे
विंचूर येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन देवकते कुटुंबीयांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी देवकते कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीयांना तात्काळ मदतीचा हात दिला.

अचानक घडलेल्या या दुर्घटनेत घरातील आवश्यक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य आगीत जळून नष्ट झाल्याने देवकते कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांनी देवकते कुटुंबीयांना शक्य ती मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संकटाच्या काळात महादेव कोगनुरे यांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

Advertisement
Tags :

.