ज्यांना शाळा दुरुस्त करता येत नाही, ते शिक्षण खाते काय सांभाळणार ?
विनायक राऊतांची मंत्री केसरकरांवर जोरदार टीका
सावंतवाडी प्रतिनिधी
शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे बालपणी ज्या शाळेत शिकले ती शाळा आज पूर्णपणे मोडखळीस आली आहे . ही शाळा या पावसात कोसळली आहे. आपल्या घरची आणि हक्काची असलेली शाळा ज्यांना दुरुस्त करता येत नाही ते शिक्षण खात्याचा कारभार काय सांभाळणार . त्यांना शिक्षण खात्याबाबत काहीच माहित नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 22 शाळा आज मोडकळीस व धोकदायक स्थितीत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.त्यांनी शिक्षण खात्याची अत्यंत दयनीय अवस्था केली आहे. अशा शब्दात शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीकेची झोड माजी खासदार विनायक राऊत यांनी उठवली आहे. श्री राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ ची इमारत कोसळली आहे. या धर्तीवर श्री राऊत यांनी या शाळेची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन-चार दिवसांपूर्वी जि . परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक या शाळेत जवळपास 13 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची भिंत कोसळली असे असताना विद्यार्थ्यांना त्या शाळेतच ठेवण्यात आले होते. याबाबत श्री राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी श्री राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत शाळेची व सावंतवाडी एसटी बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी. शिवसेनासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, माजी जि प सदस्य मायकल डिसोजा ,चंद्रकांत कासार ,दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, युवा सेना तालुकाधिकारी कौस्तुभ गावडे ,जिल्हा संघटक शब्बीर मणियार शहर प्रमुख शैलेश गंवडळकर ,आबा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते .