For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Girija Raut | माझी फक्त नवऱ्यासोबत सुखी संसार करण्याची इच्छा होती पण... सासरांच्या आरोपांवर काय म्हणाल्या गिरीजा राऊत

04:44 PM Jul 12, 2026 IST | NEETA POTDAR
girija raut   माझी फक्त नवऱ्यासोबत सुखी संसार करण्याची इच्छा होती पण    सासरांच्या आरोपांवर काय म्हणाल्या गिरीजा राऊत
Advertisement

मुंबई : ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला असून त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पती गितेश राऊत आणि सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे... त्यांनी सुनेवर गंभीर आरोप करत म्हणलंय की. गिरीजा राऊत यांनी पहीला का तक्रार केली नाही

Advertisement

विनायक राऊत म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती..

काय केलेत आरोप ?

Advertisement

गिरीजा राऊत यांनी सांगितले की, डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाल्यानंतर सप्टेंबर २०१८ पर्यंत त्यांचे आणि पती गितेश राऊत यांच्यात शारीरिक संबंध झाले नव्हते. पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करत, ही बाब लपवण्यासाठीच आपल्यावर अघोरी उपचार करण्यात आले, असा गंभीर दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी अघोरी उपचारांच्या नावाखाली विविध बाबांकडे नेण्यात आल्याचा आरोप केला. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवणे, केस ओढणे, विविध वस्तूंचे उतारे करणे, तसेच हायपोथायरॉईडचा त्रास असतानाही औषधे देऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला.

"मला पैशांची अपेक्षा नव्हती. माझी फक्त नवऱ्यासोबत सुखी संसार करण्याची इच्छा होती. मात्र मला अपमानित करण्यात आले, अघोरी प्रकारांना सामोरे जावे लागले आणि भयंकर मानसिक छळ सहन करावा लागला," असा आरोपही गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

Advertisement
Tags :

.