सावंतवाडीत दत्त मंदिर समितीच्या वतीने विनायक राऊत यांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी- भटवाडी येथील दत्त मंदिर संस्थेच्या वतीने मंदिर समितीचे उदय आळवणी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराच्या विकासासाठी आपण निश्चितपणे हातभार लावू असे यावेळी विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार राजन तेली ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, निशांत तोरस्कर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. श्री राऊत यांनी आज दत्त जयंती निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी ,भटवाडी ,धवडकी, एसटी बस स्थानक आदी दत्त मंदिर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबराचा गजरही केला. यावेळी श्री राऊत म्हणाले निश्चितपणे आम्ही जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहोत. जनतेचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य निश्चितपणे आम्ही पूर्ण करणार आहोत . जनतेने आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. कोकणच्या विकासासाठी नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नेहमी कटिबद्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.