उद्धव ठाकरेंच्या सावंतवाडी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊतांनी केली पाहणी
सावंतवाडी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,बाळा गावडे, रुपेश राऊळ गितेश राऊत ,आबा सावंत ,शैलेश परब,रुची राऊत, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राऊत त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. विकासाच्या फाईलवर कसं बसायचं हे दीपक केसरकरांकडून शिकावं. त्याचे उदाहरण म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. विकासाचे केवळ नारळ फोडायचे आणि पुढे काहीच करायचे नाही. आमच्या आड घेण्याचा प्रयत्न करू नका ,आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार असा टोला खासदार विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला. केसरकरांनी स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल हे पहावं आणि मगच बोलावे . लोकसभेच्या निवडणुकीनंतर केसरकर यांची घसरण सुरू होईल अशी जोरदार टीका आज येथे खासदार राऊत यांनी केली. दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी केसरकर मंत्री नारायण राणेंची आरती ओवाळायला लागलेत. ज्या शिवसेनेने केसरकर यांना मंत्री केलं त्याच शिवसेनेशी गद्दारी करून केसरकर आता फडणवीस आणि नारायण राणेंची चाकरी करायला निघाले आहेत असे टीकास्त्र खासदार विनायक राऊत यांनी केले.