Kolhapur Politics : जनसुराज्यचे काम बघवत नाही म्हणून आरोप, विनय कोरे यांचा सतेज पाटीलांवर हल्लाबोल
आयटी पार्क जागा व्यवहारावर राजकीय आरोप-प्रत्यारोप,
कोल्हापूर : आयटी पार्क येथील जागेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आमदार सतेज पाटील यांना जनसुराज्यचे चांगले काम बघवेना. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना आपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असा पलटवार आमदार विनय कोरे यांनी केला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी रविवारी एका प्रचार सभेत आयटी पार्कमधील जागेच्या व्यबहारावरुन जनसुराज्य पश्नावर टीका केली. महापालिकेसाठी राखीव ठेवलेली ५०० कोटी रुपयांची जागा आमदार कोरे यांनी ३० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप केला. आमदार विनय कोरे यांचा सतेज पाटील यांच्यावर पलटवार त्यावर सोमवारी आमदार कोरे यांनी पलटवार करताना ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेने रेडीकनर दराने घेतली.
याठिकाणी महिलासाठी रोजगार निर्माण केला जाणार आहे. पण जनसुराज्यचे चांगले काम न पाहवणाऱ्या लोकांनी त्यावर गरळ ओकायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहे असे आमदार कोरे यांनी म्हंटले आहे.