For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्येतून निवडणूक लढविण्याचे विनय कटियार यांचे संकेत

06:06 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अयोध्येतून निवडणूक लढविण्याचे विनय कटियार यांचे संकेत
Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

उत्तरप्रदेशात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांनी मोठा राजकीय संकेत दिला आहे. अयोध्येत स्वत:च्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कटियार यांनी निवडणूक लढण्याच्या तयारीची घोषणा केली.

ही बैठक बंद दाराआड अनेक तास चालली. यात आगामी विधानसभा निवडणुकीवरून रणनीतिवर विचारविनिमय झाला. बैठकीनंतर राम मंदिर आंदोलनातील मुख्य चेहरे राहिलेल्या विनय कटियार यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक लढण्याची आमची तयारी नसल्याचे म्हणणे चुकीचे आहे. योग्यवेळी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. अयोध्या विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवू शकतो असे कटियार यांनी म्हटले आहे.

Advertisement

राम जन्मभूमी माझी कर्मभूमी आहे. निवडणुकीचा शंखनाद येथूनच होणे स्वाभाविक आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांची घेतलेली भेट ही शिष्टाचाराची होती. पक्षसंघटन आणि कार्यकर्त्यांसोबत माझा सातत्याने संवाद असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.