For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिंदल गॅस टर्मिनल विरोधात ग्रामस्थ आक्रमक

03:38 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
जिंदल गॅस टर्मिनल विरोधात ग्रामस्थ आक्रमक
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

जिंदल गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित व्हावे या मागणीकरिता नांदिवडे ग्रामस्थांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आह़े नांदिवडे प्रदुषण विरोधी संघर्ष कृती समिती यांच्याकडून मागणी मान्य न झाल्यास 14 एप्रिलपासून जिंदल गॅस टर्मिनल येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आह़े त्यासंबंधीचे पत्र बुधवारी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे देण्यात आले.

12 डिसेंबर 2024 रोजी नांदिवडे माध्यमिक विद्यालयातील 80 हून अधिक विद्यार्थ्यांना वायुगळतीमुळे त्रास जाणवू लागला होत़ा त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनल मधून झाला असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े भविष्यातही या गॅस टर्मिनलमुळे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आह़े त्यामुळे हा गॅस टर्मिनल त्याठिकाणाहून हटवावा, अशी मागणी नांदिवडे ग्रामस्थ करत आहेत़

Advertisement

वायुगळतीप्रकरणी जिंदलच्या तिघा अधिकाऱ्यांविऊद्ध प्रशासनाने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े अशा प्रकारची गंभीर घटना घडून देखील कंपनीविऊद्ध कोणतीही कारवाई झालेली नाह़ी तसेच कंपनीकडून गॅस टर्मिनलचे कामकाज सुरू करण्यात आले आह़े टर्मिनलला देण्यात आलेल्या परवानगीविषयी कागदपत्रांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल होत़ी मात्र यासंबंधी कोणतेही दस्तऐवज प्रशासनाकडून देण्यात आलेले नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आह़े

Advertisement
Tags :

.