कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोनुर्ली जत्रोत्सवाची तयारी युध्द पातळीवर

03:33 PM Oct 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रस्ता सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबरला साजरा होत आहे. यानिमित्ताने देवस्थान कमिटीकडून ग्रामस्थांच्या मदतीने जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुर्तफावरील झाडी तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत युध्द पातळीवर नियोजन सुरु आहे.एकूणच या जत्रोत्सवाची ओढ सर्वांना लागून राहिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाकडे पाहिले जाते.आगळीवेगळी लोटांगणाची जत्रा म्हणूनही ही जत्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.यानिमित्त देवस्थान कमिटीकडून जत्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर हाती घेतली आहे.सद्यस्थितीत मंदिर परिसराची साफसफाई , विद्युत रोषणाई, मंडप व्यवस्था आदी कामे हाती घेण्यात आली आहेत . तसेच मंदिराकडे जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या दुर्तफा झाडे बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने ग्रामस्थांनी हाती घेतले आहे.गेल्या चार पाच दिवसापासून हे काम सुरु असून खुद्द ग्रामस्थांनी यात सहभाग दर्शविला आहे.यावर्षी जत्रोत्सवावर काहिसे पावसाचे सावट असल्याने तशा प्रकारची उपाययोजना करण्याचे नियोजन देवस्थान कमिटीकडून केले आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात येणारे भाविकभक्त आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग व्यवस्थेवरही यावर्षी भर देण्यात आलेला आहे.कुठल्याही प्रकारे जत्रोत्सवाला येताना वाहतूक कोंडी तसेच अडचण होऊ नये यासाठी देवस्थान कमिटीकडून काळजी घेण्यात येत आहे.सावंतवाडी पोलिस प्रशासनालाही याबाबत कळवण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चोख नियोजन करत जत्रोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटीने कंबर कसली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article