महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भिरवंडे - बौद्धवाडीतील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

03:56 PM Oct 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कनेडी // वार्ताहर -

Advertisement

कणकवली मतदार संघांचे भाजप उमेदवार नितेश राणे आणि माजी जि. प . अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या विकास कामांच्या कार्याने प्रेरित होऊन भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक महिला व ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला. कनेडी बाजारपेठ येथील भाजपच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला असून प्रवेशकर्त्यांचे संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वागत केले. यावेळी प्रशांत कांबळे, मुकुंद कांबळे, स्वप्नील जाधव, राजू जाधव, विनायक कांबळे, सुशील कांबळे, स्वप्ना कांबळे, शोभना पवार, शौर्या जाधव, प्राची कांबळे, स्नेहा पवार, लक्ष्मीकांत कांबळे आदी ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला, कनेडी दशक्रोशीतील गावातील बौद्धवाडी मध्ये आम. नितेश राणे व गोट्या सावंत यांनी केलेली विकासकामे पाहून आम्ही हा पक्ष प्रवेश केला असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे गोटया सावंत यांनी सांगितले. यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत,भरत गावकर भिरवंडे शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे,मिलिंद बोभाटे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun bharat news # konkan update # news update # marathi news #
Next Article