For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जबदरस्तीने विद्युत पोल उभारण्याचे काम ग्रामस्थांनी पाडले हाणून

12:34 PM Nov 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
जबदरस्तीने विद्युत पोल उभारण्याचे काम ग्रामस्थांनी पाडले हाणून
Advertisement

सोनुर्लीतील प्रकार ; शेतजमिनीचे नुकसान होणारी विद्युत लाईन नकोच ; ग्रामस्थांची भूमिका

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
ग्रामस्थांना विश्वासात न घेता तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून काम न करण्याची लेखी सूचना दिलेली असताना सोनुर्ली येथे वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून जबरदस्तीने अकरा केव्ही विद्युत लाईनचे पोल टाकण्याचे काम ग्रामस्थांनी आज हाणून पडले, शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान करत कॉरी क्रशरच्या फायद्यासाठी होणारे हे काम आम्ही कदापीही होऊ देणार नाही असा इशारा सोनुर्लीतील ग्रामस्थांनी दिला आहे.सोनुर्ली गावातून वेत्ये आणि इन्सुली या गावाच्या ठिकाणी होऊ घातलेल्या एका क्रशर काॅरीसाठी अकरा केव्ही विद्युत लाईन मंजूर आहे .ही लाईन टाकण्यासाठी तेथील शेतकरी ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे, सुरुवातीला या ठिकाणी काम करण्यासाठी आलेल्या संबंधित ठेकेदाराने वन विभागाची परवानगी न घेता झाडेही तोडली होती. या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित ठेकेदाराला समज दिली होती. तसेच शेतकऱ्यांना जमिनीचे होणारे नुकसान पाहता हे काम वीज वितरण कंपनीने करू नये असे लेखी पत्र वीज वितरण कंपनीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे काम केले जाईल असे वीज वितरण कडून कळवण्यात आले होते. परंतु असे असताना आज अचानक ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित वीज वितरणच्या ठेकेदाराने जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून विद्युत लाईन ओढण्यासाठी पोल टाकण्याचे काम सुरू केले. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात येतात त्याने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत हे काम बंद पाडले, उपसरपंच भरत गावकर यांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतले, संबंधित ठेकेदाराकडून आम्हाला विविध वीज कंपनीकडून हे काम करण्यास सांगितले आहे असे उत्तर दिले मात्र आम्हाला आमच्या शेतीचे नुकसान करून तसेच गावाच्या फायद्यासाठी या विद्युत लाईन चा काहीच फायदा नसताना हे काम आम्ही कदापी करू देणार नाही असा पवित्रा उपस्थित ग्रामस्थांनी घेतला.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे काम करा कोणतेही वादावादी नको अशी सूचना देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.