माणगावच्या गावकऱ्यांचा एकता आणि सामाजिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न उल्लेखनीय आहे
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची प्रतिक्रीया
कोल्हापूरः (माणगांव)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेटीत शाहू महाराजांनी पुढचा राजा, दलित जनतेचा राजा म्हणून याच भूमीत घोषणा केली. माणगावच्या गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहायला मिळाली. गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली. सामाजिक सलोखा टिकवण्याचा माणगावकरांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी विचारणा झाल्यावर मंत्री शिरसाठ म्हणाले, कार्यक्रम ज्या उंचीचा व्हायला पाहिजे होता त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. अधिवेशन चालु असल्याने, माझी उपस्थिती सुद्धा नक्की नसल्यामुळे शासकीय कार्यक्रम घ्यावा म्हणून त्यांनी नियोजन केलं. लंडन हाऊसचं काम अपूर्ण आहे याबाबतच्या सूचना मी दिल्या आहेत, एप्रिल पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा भेट देणार आहे. काम तातडीने करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.