खादरवाडीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी
10:45 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : खादरवाडी येथील रस्त्याचे काम अपूर्ण असून, त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन यांच्या नावे ग्रामस्थांनी गुऊवारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खादरवाडीतील 1.80 मीटर मुख्य रस्त्याचे काम 10 जानेवारी रोजी सुरू करण्यात आले. काही भागाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. उर्वरित भागाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेच नाही. या रस्त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. उर्वरित रस्त्याचे काम येत्या 7 दिवसांत पूर्ण करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना करावी. मागील तीन वर्षांत गावामध्ये केणतीही विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
Advertisement
Advertisement