पेंडूर येथील आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी घेतला लाभ
देवस्थान ट्रस्टचे आयोजन ; गोरगरीब, वयोवृद्ध ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टचे मानले आभार
कट्टा / वार्ताहर
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पेंडूर गावचा मांड उत्सव भक्तिमय वातावरणात दिमाखात सुरु आहे. यानिमित्त देवस्थान विश्वस्त मंडळ, पाच बारा मानकरी यांच्यावतीने विविध सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट जि. प. आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि न्युरोसीनेप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा शुभारंभ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब,विश्वस्त दाजी सावंत रमेश सावंत दिलीप परब प्रमोद परब नंदकुमार परब बिपिन परब दीपा सावंत सरपंच नेहा परब उपसरपंच सुमित सावंत संतोष सावंत रामू सावंत अमित पटेल भाऊ पटेल आप्पा सावंत व पाच बारा मानकरी गावकर मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराचा पेंडूर गावातील सुमारे 230 ग्रामस्थांनी लाभ घेतला. यामध्ये तरुण वयोवृद्ध तसेच गोरगरीब अशा सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. गावातच अशा प्रकारचा आरोग्याच्या बाबतीत लाभ मिळाल्यामुळे गावातील गोरगरीब व वयोवृद्ध ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टचे आभार मानले. प्रत्येकाला या आरोग्य शिबिराचा लाभ मिळाल्याने अशा प्रकारच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. व असेच उपक्रम वारंवार गावात राबविले जावे असे मत ग्रामस्थांनी मांडले.