Jawali Taluka | जावली तालुकातील अंधारी गावात वृक्षतोडीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; महामार्गाचे काम बंद
पाचवड–मेढा–बामणोली मार्गावरील काम थांबवले;
कास -जावली तालुक्यातुन पाचवड मेढा ते अंधारी बामणोली कांदाटी खोरे मार्गे खेड चिपळूण होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अंधारी गावच्या हाद्दीत रस्त्यालगत स्वमालकीच्या जागेत लागवड केलेल्या वृक्षांची विनापरवाना ठेकेदाराने तोड केल्यामुळे अंधारी ग्रामस्थांनी आक्रमक भुमीका घेत स्थानिक शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करून जर विकास होत असेल तर तो काय कामाचं म्हणत रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले
अंधारी येथील शेतकऱ्याने स्वतः स्वमालकीत लावलेल्या जागेत आंबा, फणस,जांभूळ या फळ झाडांची शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता रस्ता रुंदीकरणाचे काम करत असलेल्या ठेकेदाराने राजरोसपणे कत्तल तोड केली आहे .घटनेची माहीती अंधारी येथील ग्रामस्थांना कळल्यावर सर्व स्थानिक लोकांनी एकत्र बैठक करून सर्वच ग्रामस्थांचा अंधारी गावातून पुढे जाणाऱ्या महामार्गाच्या कामास विरोध करून काम बंद पाडून कोळघर ते अंधारी असलेल्या सुमारे तीन ते चार किलोमीटर कामास विरोध दर्शविला.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून जर विभागात विकास होणार असेल तर तो न करून देण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांसह,कोयना बामणोली विभागातील सामाजिक कार्यकर्ते,अंधारी कास ग्रुपग्रामपंचायतचे उपसरपंच रवि शेलार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.त्यावेळी माजी सरपंच तानाजी शेलार,मंडळाचे अध्यक्ष डि. के. शेलार,पोलिस पाटील आप्पाजी शेलार, अशोक शेलार,डि . एन . शेलार,रघुनाथ शेलार पांडुरंग शेलार,अक्षय शेलार,कांताराम शेलार,आनंद शेलार, सहदेव शेलार, विठ्ठल शेलार,विक्रम शेलार नवनाथ शेलार, आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा करून असा ठराव ग्रामपंचायत अंधारी कासच्या सरपंच सुरेखा दिलीप शेलार यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन लवकरात लवकर ग्रामसभेचा ठराव मंजूर घेण्याचा निर्धार अंधारी ग्रामस्थांकडून करण्यात आला असल्याची माहीति ग्रामस्थांनी दिली राजरोसपणे झाडांची कत्तल होत असताना जावली वनविभाग मात्र अन्नभिन्न दिसुन येत आहे