कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निळ्या डोळ्यांच्या लोकांचे गाव

06:07 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निळे डोळे हे भाग्याचे लक्षण आहे, अशी समजूत आहे. निळ्या डोळ्यांचे लोक संख्येने अतिशय कमी असतात, त्यामुळे अशा डोळ्यांसंबंधी सर्वसामान्यांना आकर्षण अधिक असते. तथापि, या पृथ्वीवर एक गावच्या गाव असे आहे की ज्यातील सर्व लोकांचे डोळे निळे आहेत. या गावातील लोकांचे डोळे निळ्या रंगाचा काचेसारखे चमकणारे आणि पारदर्शी असतात. येथील काही जणांचे डोळे तर इतके भेदक आहेत, की पहाणाऱ्याला भीती वाटल्याशिवाय रहात नाही.

Advertisement

Advertisement

ज्या रंगाच्या डोळ्यांची माणसे साऱ्या पृथ्वीवर अत्यल्प संख्येने आहेत, त्या रंगाचे डोळे असणारी माणसे या गावात मात्र इतक्या मोठ्या संख्येने कशी, हा प्रश्न संशोधकांना पडल्याने त्यांनी शोधकार्याला प्रारंभ केला. त्यांनी प्रथम या माणसांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशिया या देशातील सुलावेसी प्रांताच्या ‘बुटॉन’ या लहानशा बेटावर या लोकांची वस्ती आहे. हे ‘बुटॉन’ या जमातीचेच लोक आहेत. या जमातीच्या सर्वच लोकांचे डोळे निळे असतात. या लोकांची जनुकीय संरचनाच अशी आहे, की त्यांचे डोळे निळेच असतात. ही एक अत्यंत दुर्लत्र जनुकीय स्थिती आहे. यामुळे जगात 42 हजार व्यक्तींमागे एकाचे डोळे निळे असतात. मात्र, संशोधकांच्या म्हणण्यानुसार निळे डोळे दिसायला सुंदर असले, तरी अशा डोळ्यांच्या लोकांना अनेक शारिरीक समस्यांना नेहमी तोंड द्यावे लागते.

परिणामी ही जनुकीय स्थिती एक व्याधी किंवा डिसऑर्डर मानली जाते. या बेटावरील लोकांची श्रवणशक्ती दुर्बळ आहे. तसेच त्यांच्या डोळ्यांचा गडद निळा रंग कायमचा टिकत नाही. तो कित्येकदा फिका होत जातो. त्यामुळे एक डोळा गडद निळा, तर दुसरा फिका निळा अशी विचित्र स्थिती या बेटावरील कित्येकांची आहे. शेवटी देव एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने काहीतरी काढून घेतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article