विलवडेचे ग्रामदैवत माऊलीचा जत्रोत्सव उद्या
ओटवणे | प्रतिनिधी
विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या आणि माहेरवाशिणीची पाठीराखी असलेल्या माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
यानिमित्त सकाळी मंदिरात पुजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर माऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार आणि आकर्षक फुलानी सजविण्यात येणार आहे. सकाळी कुळ घराकडून देवीची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मामा मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी आणि विलवडे ग्रामस्थांनी केले आहे.