‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसणार विक्रांत
राशी खन्ना, रिद्धि डोगरा मुख्य भूमिकेत
विक्रांत मैसी सध्या मनोज कुमारची व्यक्तिरेखा साकारून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘12 वी फेल’ चित्रपट अत्यंत नावाजला गेला आहे. चित्रपटाच्या कहाणीपासून विक्रांतच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. याचदरम्यान अभिनेत्याने स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
विक्रांतला आता मोठा प्रोजेक्ट मिळाला असून तो पुन्हा एकदा सत्यघटनेसोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेससोबत घडलेली घटना सर्वांच्याच लक्षात असावी. आता याच घटनेला मोठ्या पडद्यावर विक्रांत मैसी दर्शविणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाद्वारे साबरमती एक्स्प्रेसमध्ये झालेल्या एका कहाणीचा उलगडा होणार असल्याचे निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा करताना नमूद पेल आहे.
चित्रपटात विक्रांत सोबत रिद्धि डोगरा आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन रंजन चंदेल हे करणार आहेत. विक्रांत अणि त्याची पती शीतला ठाकूर लवकरच मातापिता होणार आहेत. दोघांनी फेब्रुवारी 2022 मध्ये विवाह केला होता.