For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विक्रांत सावंत यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नियुक्ती

02:58 PM Jun 13, 2026 IST | अनुजा कुडतरकर
विक्रांत सावंत यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नियुक्ती
Advertisement

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून अभिनंदन !

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः विशेष पत्र पाठवून विक्रांत सावंत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये विक्रांत सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पोहोचवाव्यात असे आवाहन केले आहे.लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन केली आहे. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील ‘जन आरोग्य समिती’ आणि रुग्णालयांतील ‘रुग्ण कल्याण समिती’च्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि शुद्ध पाण्यासाठी काम करणार आहे.विक्रांत सावंत यांच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवरील या नियुक्तीमुळे सावंतवाडी आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थेलाअधिक गती मिळणार असून या निवडीबद्दल विक्रांत सावंत यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.