For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार विक्रांत मैसी

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार विक्रांत मैसी
Advertisement

यश मिळताच आणखी अनेक लाभ मिळू लागतात. असाच प्रकार अभिनेता विक्रांत मैसीसोबत घडला आहे. मागील वर्षी त्याचा चित्रपट ट्वेल्थ फेल यशस्वी ठरल्यावर विक्रांत मैसीकडे काही नवे प्रोजेक्ट्स आले आहेत. सध्या त्याच्याकडे 5 चांगले प्रोजेक्ट्स आहेत. रईस चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्यासोबतही विक्रांत चित्रपट करणार आहे. राहुल आणि विक्रांत यांच्यात एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाविषयी चर्चा सुरू होती. आता दोघांमध्ये या चित्रपटासंबंधी सहमती झाली आहे. विक्रांतच्या या नव्या चित्रपटाची लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. मधु मंटेना यांच्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीमध्ये सुरू होणार आहे.

Advertisement

परंतु या चित्रपटातील विक्रांतचे पात्र किंवा मुख्य नायिकेविषयी कुठलीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. दिग्दर्शक राहुल या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यापूर्वी स्वत:चा आगामी चित्रपट ‘अग्नि’ची तयारी करत आहे. या चित्रपटात दिव्येंदु शर्मा, सई ताम्हणकर आणि प्रतीक गांधी हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे.  विक्रांत लवकरच ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसून येईल. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर विक्रांत हा द साबरमती रिपोर्ट, सेक्टर 36, आंखों की गुस्ताखियां या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो राजकुमार हिरानी यांच्या पहिल्या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.