प्रीतम पेड्रो’ मध्ये विक्रांत खलनायक
विक्रांत मैसीने अनेक चित्रपट अन् वेबसीरिजद्वारे स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. मागील वर्षी प्रदर्शित फिर आई हसीन दिलरुबा, सेक्टर 36 आणि द साबरमती रिपोर्ट या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. विक्रांत आता खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राजकुमार हिरानी यांची पहिली वेबसीरिज ‘प्रीतम पेड्रो’मध्ये राजकुमार हा खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजकुमार हिरानीचा पुत्र वीर हिरानी आणि अरशद वारसी या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. वीर या सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर अरशद वारसी हा अनुभवी पोलीस अधिकारी ‘पेड्रो’च्या भूमिकेत असेल.
राजकुमार हिरानी या सीरिजद्वारे स्वत:च्या पुत्राला अभिनयाच्या क्षेत्रात आणत आहेत. या सीरिजचे चित्रिकरण सध्या मुंबईत सुरू असून मार्च महिन्यापर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. सह-दिग्दर्शक म्हणून या सीरिजशी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अविनाश अरुण जोडले गेले आहेत.