For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री श्री रविशंकरांच्या बायोपिकमध्ये विक्रांत

06:29 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्री श्री रविशंकरांच्या बायोपिकमध्ये विक्रांत
Advertisement

आंतरराष्ट्रीय कलाकारांनी नटलेला चित्रपट

Advertisement

सिद्धार्थ आनंद यांनी आता ‘पठान’ तसेच ‘वॉर’नंतर नव्या चित्रपटाची तयारी केली आहे. सिद्धार्थ आनंद नवा चित्रपट घेऊन येत असून यात नायकाच्या भूमिकेत विक्रांत मैसी असेल. विक्रांत आता लवकरच श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. चित्रपटाचे नाव व्हाइट ठेवण्यात आले आहे. जगप्रसिद्ध फोटोग्राफी डायरेक्टर जुआन कार्लोस गिल या चित्रपटाच्या टीममध्ये सामील आहेत. ते आणि त्यांची टीम सध्या भारतात चित्रिकरणात सामील झाले आहेत. याचबरोबर हॉलिवूड अभिनेता डेरियो याजबेक बर्नाल देखील या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.

सध्या हे चित्रिकरण बेंगळूर येथे पार पडले आहे. तर बहुतांश चित्रिकरण विदेशात झाले आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. श्री श्री रविशंकर यांनी कोलंबियातील 52 वर्षे चाललेले गृहयुद्ध कसे संपविले होते, यावर याची कहाणी आधारित आहे. श्री श्री रविशंकर यांच्या पुढाकारानंतर हे गृहयुद्ध शांत झाले होते. हा चित्रपट हिंदी, इंग्रजीसमवेत अनेक भाषांमध्ये तयार केला जात आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मोंटू बस्सी करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.