महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विक्रमांचा विक्रम केलेला विक्रमवीर

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विनोद कुमार चौधरी हा जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक कर्मचारी आहे. त्याचे काम संगणक चालविणे म्हणजेच काँप्युटर ऑपरेट करणे हे आहे. दिवसभर तो संगणकावर काम करतो. त्याच्याकडे पाहिले तर तो विक्रमवीर असेल असे कोणालाही वाटत नाही. सध्या त्याचे वय 41 वर्षे आहे. त्याच्या नावावर 9 विक्रम असून सर्व विक्रमांची नोंद गिनिज विक्रम पुस्तिकेत झालेली आहे. हे विक्रम त्याने टायपिंग किंवा टंकलेखन वेगाच्या संदर्भात केलेले आहेत. संगणकात माहिती भरताना टंकलेखन करावे लागते. चौधरी या विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र या विभागात कामाला आहे. त्याचा टंकलेखन वेग अविश्वसनीय आहे.

Advertisement

तसा अनेकांचा टंकलेखन वेग अचाट असतो. त्यात फारसे नाविन्य नाही. तथापि, चौधरी यांचे वैशिष्ट्या असे की ते बोटांप्रमाणे नाकाने टंकलेखन करतात. 2014 मध्ये त्यांनी नाकाने टंकलेखन करुन 46.30 सेकंदांमध्ये 103 कॅरॅक्टर्स टाईप करुन प्रथम विश्वविक्रम केला होता. त्याची नोंद गिनीज विक्रमपुस्तिकेत झाली होती. ते आपल्या तोंडात एक काडी धरुन त्या काडीनेही वेगाने टंकलेखन करु शकतात. तसा विक्रमही त्यांनी केला आहे. 2016 मध्ये त्यांनी 6.71 सेकंदात सर्व इंग्रजी मुळाक्षरे डोळे बंद करुन टंकलिखित केली आणि आणखी एक विक्रम केला. नंतर त्यांनी हा विक्रम 6.09 सेकंदांमध्ये करुन आपलाच विक्रम मोडला. 2017 मध्ये त्यांनी तोंडात काडी धरुन सर्व मुळाक्षरे 18.65 सेंकंदांमध्ये टंकलिखित करण्याचा नवा विक्रम केला. 2018 मध्ये त्यांनी हाच विक्रम 17.69 सेकंदांमध्ये केला. नंतर 2019 मध्ये हाच विक्रम त्यांनी 17.01 सेकंदांमध्ये केला. 2019 मध्ये त्यांनी एकाच बोटाने टंकलेखन करुन 29.53 सेकंदांमध्ये सर्व मुळाक्षरांचा विक्रम केला. सचिन तेंडुलकरने 19 विक्रमांची नोंद केली आहे. आपले ध्येय टंकलेखन क्षेत्रात या विक्रमाला गवसणी घालण्याचा आहे, असे ते म्हणतात.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article