महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विक्रम-1 अग्निबाणाचे यशस्वी परीक्षण

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /हैद्राबाद

Advertisement

‘स्कायरुट’ या हैद्राबाद येथील स्टार्टअप कंपनीने आपल्या विक्रम-1 या अग्निबाणाच्या दुसऱ्या टप्प्याचे यशस्वी परीक्षण केले आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रात हे परीक्षण बुधवारी करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारचे परीक्षण करणारी ही भारतातील प्रथम खासगी कंपनी आहे. या दुसऱ्या टप्प्यातील अग्निबाणाला कलाम-250 असे नाव देण्यात आले आहे. हे परीक्षण 85 सेकंदांच्या कालावधीत पूर्ण झाले आहे. हा अग्निबाण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आला आहे. त्यातील सर्व साधने परीक्षणाच्या कालावधीत समाधानकारकरित्या कार्यरत राहिली. बुधवारच्या यशामुळे भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात एक नवा इतिहास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

कक्षीय प्रक्षेपणास सज्ज

या अग्निबाणाची आतापर्यंत अनेक परीक्षणे झाली असून ती यशस्वी झाली आहेत. त्यामुळे आता ही कंपनी अवकाशात कक्षीय प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. फ्लेक्स नोझल यंत्रणा हा कोणत्याही अग्निबाणातील महत्त्वाचा भाग असतो. या अग्निबाणातील या यंत्रणेने अपेक्षित कार्यक्षमता सिद्ध केल्याने एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. कंपनी आपल्या विक्रम-1 या अग्निबाणाचे सर्वंकष प्रक्षेपण याच वर्षाच्या उत्तरार्धात करणार आहे. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारी ही भारतातील प्रथम खासगी कंपनी ठरेल, अशीही माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article