For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या, विखे पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून वक्तव्य

11:45 AM Jan 22, 2025 IST | Pooja Marathe
वाळूवाले आपलेच  त्यांना सोडून द्या  विखे पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून वक्तव्य
Advertisement

वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटलांची भूमिका ?
सोलापूर
भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सगळीगडे चांगलीच चर्चा रंगली आहे. वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जलसंपदा मंत्री यांनी वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची भूमिका आहे का? असेही सगळीकडे चर्चा सुरु आहे.
टेंभुर्णी येथे एका अत्याधुनिक चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी व्यासपीठावरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून अशी टिप्पणी केली. त्याच्या या वक्तव्यावर मंत्री विखे पाटील यांनी मात्र पत्रकार परिषदेत उत्तर दिले. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्कारांवर सरकार कारवाई करत आहे. उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढणार आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, बबनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.