विजयवीरला नेमबाजीत राष्ट्रीय जेतेपद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत पंजाबचा नेमबाज विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत राष्ट्रीय जेतेपद मिळविताना पंजाबचा ऑलिम्पिक नेमबाज गुरुप्रित सिंगला मागे टाकले आहे.
सदर स्पर्धा येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी क्रीडा संकुलात खेळविली जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या विजयवीरने 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत गुरुप्रित सिंगचा 28-25 असा पराभव करत सुवर्णपदकासह राष्ट्रीय जेतेपद मिळविले. या क्रीडा प्रकारात भारतीय हवाई दलातील शिवम शुक्लाने 23 गुण नोंदवित कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत पुरुषांच्या कनिष्ठ विभागात भायरताच्या राजवर्धन आशुतोष पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. मध्यप्रदेशच्या सुरज शर्माने रौप्य तर राजस्थानच्या अभिनव चौधरीने कास्यपदक घेतले.