For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत विजय वर्मा

06:12 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत विजय वर्मा
Advertisement

अभिनेता विजय वर्माला वर्तमानकाळातील दमदार अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. विजय पुढील काळात एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार असून ती 45 वर्षांपूर्वी प्रदर्शित एका प्रसिद्ध हॉलिवूडपटावर प्रेरित असेल. शी, दहाड, मिर्झापूर आणि मटका किंग यासारख्या वेबसीरिजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यावर विजय वर्मा आता खजिन्याच्या शोधाकरता निघणार आहे. विजयने  राहुल भट्ट आणि अभिनेत्री रिचा चड्ढासोबत एका वेबसीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

या सीरिजची कहाणी इंडियाना जोन्सप्रमाणे प्राचीन खजिन्याच्या शोधावर आधारित असेल. या सीरिजचे दिग्दर्शन सौमेंद्र पढी करत असून त्याला जामताडा सीरिजसाठी ओळखले जाते. या सीरिजचे चित्रिकरण पूर्ण झाले असून याच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम सुरू आहे. सीरिजला अत्यंत मोठ्या स्तरावर निर्माण करण्यात आले आहे, ज्यात अॅडव्हेंचर, अॅक्शन, प्राचीन रहस्य आणि खजिन्याच्या शोधासमवेत अनेक पैलू पहायला मिळतील. शोची कहाणी सौमेंद्रने परवेज शेख आणि करण व्याससोबत मिळून लिहिली आहे. नेटफ्लिक्ससाठी निर्माण होत असलेल्या या सीरिजमध्ये विजय, रिचा आणि राहुल तिघेही समांतर भूमिकांमध्ये असतील.

विजयचे पात्र खजिन्याच्या शोधाकरता निघणार आहे, तर रिचा यात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. शोमध्ये कुशा कपिला आणि अंकिता लोखंडेही महत्त्वाच्या भूमिकेत असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.