For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टाटा’च्या मुख्य ट्रस्टमधून विजय सिंह यांचा राजीनामा

06:37 AM Aug 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘टाटा’च्या मुख्य ट्रस्टमधून विजय सिंह यांचा राजीनामा
Advertisement

कार्यकाळ 14 ऑगस्ट रोजी समाप्त होणार : टाटा सन्समध्ये अंदाजे 66 टक्क्यांचा वाटा

Advertisement

वृत्तसंस्था मुंबई 

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सवर नियंत्रण ठेवणाऱ्या दोन मुख्य ट्रस्टपैकी एक असलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट म्हणजेच एसआरटीटीचे उपाध्यक्ष विजय सिंह यांनी राजीनामा दिला आहे. माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा सध्याचा कार्यकाळ 14 ऑगस्ट रोजी संपत असून, त्यांनी पुढील कार्यकाळासाठी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दरम्यान, ते टाटा समूहाचा आणखी एक मुख्य ट्रस्ट असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट म्हणजेच एसडीटीटीमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत राहतील. टाटा ट्रस्ट्स  एसआरटीटी आणि एसडीटीटीकडे टाटा सन्समध्ये अंदाजे 66 टक्क्यांचा हिस्सा आहे. टाटा ट्रस्ट्समधील अंतर्गत वाद आणि नियामक कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर विजय सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे. नियामक निर्बंधांमुळे, एसआरटीटी सध्या विश्वस्तांच्या बैठका घेऊ शकत नाही.

धर्मादाय आयुक्तांनी 400 कोटी रुपयांची देणगी गोठवली

महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी मे महिन्यात एकतर्फी आदेश जारी करून एसआरटीटीला 16 मे रोजी होणारी प्रस्तावित बैठक पुढे ढकलण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील सुधारणेनुसार एसआरटीटीच्या संचालक मंडळाची रचना झाली आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा आदेश आला होता. या सुधारणेनुसार संचालक मंडळावरील आजीवन विश्वस्तांची संख्या 25 टक्केपर्यंत मर्यादित आहे.

एसआरटीटीने या बंदीतून दिलासा मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे अपील केले आहे. ट्रस्टने इशारा दिला आहे की, ही बंदी कायम राहिल्यास सुमारे 400 कोटी रुपयांच्या परोपकारी अनुदानावर परिणाम होऊ शकतो. यासोबतच, 18 ऑगस्ट रोजी होणारी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) देखील ट्रस्टच्या भागीदारीत व्यत्यय आणू शकते.

रतन टाटा यांच्या निधनानंतर अंतर्गत मतभेद

रतन टाटा यांच्या निधनानंतर अंतर्गत मतभेद निर्माण झाले. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्ट्समधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर नियामक छाननी आणि वादांची ही फेरी सुरू झाली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा तणाव सार्वजनिक झाला, जेव्हा विश्वस्तांनी रतन टाटा यांचे निकटचे सहकारी मेहली मिस्त्राr यांचा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला.

यानंतर, मिस्त्राr यांनी एसआरटीटी, एसडीटीटी आणि बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनमधून राजीनामा दिला. मिस्त्राr यांनी त्यांना पदावरून दूर करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आणि प्रशासन व हितसंबंधांच्या संघर्षाशी संबंधित आरोप केले, जे टाटा ट्रस्ट्सने फेटाळून लावले.

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर निर्णय

अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विचार केला जाणार आहे. चंद्रशेखरन यांचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यकाळ ते कंपनीच्या संचालक मंडळावर राहतात की नाही यावर अवलंबून आहे. मे महिन्यातील बंदीनंतर एसआरटीटीला कोणतीही सभा घेता आलेली नाही. यामुळे टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान कसे होईल आणि प्रतिनिधींची नियुक्ती कशी केली जाईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.