नित्या मेननसोबत झळकणार विजय सेतुपति
थलाइवन थलाइवीमध्ये मुख्य भूमिकेत
विजय सेतुपति अणि नित्या मेनन यांच्या आगामी चित्रपटाचे नाव समोर आले आहे. ‘थलाइवन थलाइवी’ असे या चित्रपटाचे नाव असून याचे दिग्दर्शन पंडिराज यांनी केले आहे. हा चित्रपट नातेसंबंध, ड्रामा, कॉमेडी आणि भावनांचा मजेशीर खेळ दाखविणारा असणार आहे.dर
चित्रपटाचा टीझर सादर करण्यात आला आहे. यात किचनमधील एका दृश्याने सुरुवात होते, जेथे स्वयंपाकाच्या तयारीचे सुंदर अन् स्वादिष्ट शॉट्स दाखविले जातात. यानंतर विजय आणि नित्या हे स्वयंपाक करताना अन् एकत्र मस्ती करताना दिसून येतात.
टीझरमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येते. प्रारंभी थट्टेपासून सुरूवात होत हे दृश्य हळूच ‘किचन वॉर‘मध्ये बदलते. याचदरम्यान कॉमेडियन योगी बाबू यांची एंट्री हेते. हा चित्रपट विजय आणि नित्या यांनी एकत्र काम केलेला दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ते मल्याळी चित्रपटात एकत्र दिसून आले होते. चाहते या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.
थलाइवन थलाइवी या चित्रपटाची निर्मिती सत्य ज्योति फिल्म्सकडून करण्यात आली आहे. तर चित्रपटात संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे. विजय सेतुपति अलिकडेच विदुथलाई : पार्ट2’मध्ये दिसून आला होता. आगामी काळात तो एका चित्रपटात रुक्मिणी वंसत आणि योगी बाबू यांच्यासोबत दिसून येणार आहे. तसेच दिग्दर्शक मॅसस्किन यांच्यासोबत ट्रेन या चित्रपटात काम करत आहे.