‘ऐस’ चित्रपटात विजय सेतुपति
रुक्मिणी वसंतसोबत जमली जोडी
विजय सेतुपतिचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘ऐस’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अरुमुगाकुमारने केले आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, रोमान्स, थ्रिलर आणि ड्रामा दिसून येत आहे. या ट्रेलरमध्ये विजयची व्यक्तिरेखा मलेशियात दाखल होत असल्याचे दाखविण्यात आले असून तेथे तो स्वत:च्या भूतकाळाच्या सर्व खुणा मिटवू पाहत असाते, आता तो बोलड कन्नन नावाने ओळखला जातो. लवकरच तो रुक्मिणी वंसत साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला भेटतो. यानंतर कन्नन एका गुप्त मोहिमेत सामील झाल्याचे दाखविण्यात आले आहे. विजय सेतुपतिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबत योगी बाबू, रुक्मिणी वसंत, दिव्या पिल्लई, बबलू पृथ्वीराज, बी.एस. अविनाश, नागुलन जहरिनारिस, मुथु कुमार, राज कुमार, डेनेस कुमार, कार्तिक जय यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शक अरुमुगाकुमारनेच केली आहे. तर चित्रपटाल संगीत जस्टिन प्रभाकरनने दिले आहे.