For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गांधी टॉक्स’मध्ये विजय सेतुपति

06:32 AM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गांधी टॉक्स’मध्ये विजय सेतुपति
Advertisement

दिग्दर्शक किशोर पांडुरुंग बेलेकर स्वत:चा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गांधी टॉक्स’द्वारे प्रेक्षकांना मूकपटांची ओळख करून देणार आहे. निर्मात्यांनी याचा टीजर जारी केला आहे. हा चित्रपट 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीचे लेखन आणि दिग्दर्शक बेलेकरनेच केले असून याला अकॅडमी पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. गांधी टॉक्स एक सायलेंट ब्लॅक कॉमेडी असून यात एका पात्राच्या आर्थिक गरजा आणि त्याचा आसपासच्या लोकांवर पडणारा प्रभाव दर्शविण्यात आला आहे. महादेव नावाच्या एका युवा बेरोजगार पदवीधराची कहाणी असून तो नोकरी मिळविण्यासाठी अत्यंत आतुर आहे. त्याची भेट एक व्यापारी (अरविंद स्वामी) आणि एका चोरासोबत (सिद्धार्थ जाधव) होते. या कहणीत शांतता शब्दांपेक्षा अधिक प्रभावी आहे. मूकपट असल्याने चित्रपटात संगीत आणि हावभावानेच पूर्ण कहाणी व्यक्त करण्यात आली आहे. ‘गांधी टॉक्स’ चित्रपटात विजय सेतुपति, अरविंद स्वामी, अदिति राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव दिसून येणार आहे. टीझरमध्ये या कलाकारांच रंजक झलक दिसून येत आहे. विजय याच्या भूमिकेत हातात शस्त्र पकडून दाखविण्यात आले आहे. तर अदिति ही बाल्कनीत उभी असल्याचे दिसून येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.